मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा घेतला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील या प्रकल्पाची वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता असेल. पहिल्या टप्प्यासाठी १४९ कोटी रुपये मंजूर झाले असून, आतापर्यंत १३६.३९ कोटींचा निधी दिला आहे. ५.२३ हेक्टरवर विकसित होणाऱ्या या बंदराचा लाभ ६,६०० मच्छीमारांना होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी १५१.२९ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे आहे.
करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies