पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी काकोडकर समिती

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी काकोडकर समिती

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गामुळे खोडद येथील जीएमआरटी दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समितीला ६० दिवसांत अहवाल सादर करावयाचा आहे. मूळ मार्ग जीएमआरटीच्या जवळून जात असल्याने केंद्रीय विभागांनी चिंता व्यक्त केली होती; त्यामुळे सुधारित मार्ग आणि तांत्रिक पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies