महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक ठिकाणी अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक ठिकाणी अलर्ट

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रातील नैऋत्य वारे आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 6 ऑगस्ट रोजी रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट तर ठाणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अलर्ट मागे घेण्यात आला आहे.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies