महाराष्ट्रात १७५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

महाराष्ट्रात १७५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

महाराष्ट्रात मॉन्सूनचे दोन महिने पूर्ण झाले असले तरी पावसाचे वितरण असमान आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १७५ तालुक्यांत जून-जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर ताण आला आहे. आतापर्यंत ८२ टक्के पेरणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ लाख हेक्टरने कमी आहे.

Source: Agrowon

Read the live feed on ZapIndies