गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला ८० लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला ८० लाखांचा गंडा

अथणी येथील एका व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी गुंतवणुकीतून भरपूर नफा देण्याच्या आमिषाने ८० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली. परिचिताने दिलेल्या मोबाईल नंबरवरून संपर्क करून गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून ६ ते २७ जुलैदरम्यान व्यावसायिक, त्याची पत्नी व भावाच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. बागलकोट पोलिसांनी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Source: Tarun Bharat

Read the live feed on ZapIndies