अकोला जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळलेल्या 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून, 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. एकूण 268 शिक्षकांची चौकशी करण्यात आली असून, त्यापैकी 136 जण दोषी आढळले आहेत. बनावट कागदपत्रांसह अनियमितता उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies