बॉलिवूड अभिनेता सलमान खान, त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि 'स्टाईल अँड कंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड'च्या संचालकांना चंदीगड जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहेत. व्यावसायिक अरुण गुप्ता यांनी 'बीइंग ह्युमन' ज्वेलरी फ्रँचायझीत ३ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप केला आहे. २०२१ मध्ये दाखल तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. कंपनीने मात्र आरोप फेटाळून सलमानची थेट भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सलमान खानवर ३ कोटींच्या फसवणुकीचा आरोप, कोर्टाचे समन्स
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies