व्ही२व्ही तंत्रज्ञानाने गाड्या एकमेकांशी बोलणार

व्ही२व्ही तंत्रज्ञानाने गाड्या एकमेकांशी बोलणार

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर २०२८पासून सर्व नवीन गाड्यांमध्ये व्ही२व्ही (व्हेइकल-टू-व्हेइकल) संपर्क तंत्रज्ञान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी ५.९ गीगाहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेंसी बँड खुला करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहने वेग, दिशा, ब्रेकिंग यासारखी माहिती शेअर करून अपघात टाळू शकतील. भारतात दरवर्षी दीड लाखांहून अधिक रस्ते अपघातात मृत्यू होतो.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies