जातपडताळणी विभाग कोणाचं ऐकत नाही; बावनकुळेंचं स्पष्टीकरण

जातपडताळणी विभाग कोणाचं ऐकत नाही; बावनकुळेंचं स्पष्टीकरण

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जात पडताळणी समिती स्वतंत्र आणि अर्धन्यायिक असून सरकारचा किंवा मंत्र्यांचा त्यात हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. बावनकुळे म्हणाले, समितीच्या निर्णयावर अन्याय वाटल्यास उच्च न्यायालयात दाद मागता येईल. दरम्यान, जरांगे यांनी २९ ऑगस्टला राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies