सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 10 दिग्गजांना अपात्र

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 10 दिग्गजांना अपात्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 2011 ठराव झाले असून, नव्या सहकार कायद्यानुसार सलग 10 वर्षे कार्यकाल पूर्ण केलेल्या अध्यक्ष नितीन पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह 10 संचालकांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यांच्या जागांसाठी घरातील उमेदवार किंवा निष्ठावंतांना संधी दिली जाणार का, याकडे लक्ष आहे. भाजपला बँक स्वबळावर ताब्यात घ्यायची आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies