आशीर्वादचा चणा सत्तू १० रुपयांत १० ग्रॅम प्रोटीनसह बाजारात

आशीर्वादचा चणा सत्तू १० रुपयांत १० ग्रॅम प्रोटीनसह बाजारात

आयटीसीच्या आशीर्वाद ब्रँडने पारंपरिक पद्धतीने तयार केलेला चणा सत्तू बाजारात आणला आहे. ४७ ग्रॅमच्या पॅकची किंमत केवळ १० रुपये असून त्यातून १० ग्रॅम प्रोटीन मिळेल. हे उत्पादन विविध पॅकमध्ये उपलब्ध असून बिहारमध्ये जिरा चणा सत्तू तर पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये प्लेन चणा सत्तू विक्रीसाठी आणला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज रुस्तगी यांनी सांगितले की, हा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies