पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर यावर्षी 75 कोटींचा खर्च

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर यावर्षी 75 कोटींचा खर्च

केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर या वर्षी जुलैपर्यंत सुमारे 74.58 कोटी रुपये खर्च झाला आहे. 2021 ते जुलै 2026 या कालावधीत हा खर्च 557 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि सीपीआयचे खासदार व्ही. शिवदासन यांनी विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाने लेखी उत्तर दिले. या खर्चावरून विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies