पुण्यातील मानाचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज सायंकाळी ६:३० वाजता सुरुवात झाली. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या हस्ते आरतीनंतर विशेष 'विघ्नहर्ता रथा'तून बाप्पाला निरोप देण्यात आला. मानाचे पाच गणपती लक्ष्मी रोडमार्गे अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाले असून, ढोल-ताशांच्या गजरात भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक कर्तृत्वावर आधारित देखावा लक्ष वेधून घेत आहे.
पुण्यात मानाच्या रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Source: Lokshahi Marathi