मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांचे १९२ मोबाईल फोन चोरीला गेल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोबाईल, सोन्याच्या चैन आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. पोलिसांनी एका अल्पवयीनासह १८ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १४ मोबाईल आणि सात सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत. संशयित टोळ्यांचा शोध सुरू आहे.
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत १९२ मोबाईल चोरी, १८ अटक
Source: Prahaar