मालेगाव तालुक्यात भेळ खाल्ल्याने १४० जणांना विषबाधा

मालेगाव तालुक्यात भेळ खाल्ल्याने १४० जणांना विषबाधा

मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील आठवडे बाजारातील भेळ भत्ता खाल्ल्याने १४० हून अधिक जणांना विषबाधा झाली. बाधितांमध्ये लहान मुलांचा समावेश असून नांदगाव बुद्रुक, चिंचावड, गुंजाळवाडी आणि डोंगरगाव येथील ग्रामस्थ आहेत. सर्व रुग्ण मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर आहे. मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले असून एफडीएकडून अन्न नमुने तपासणी सुरू आहे.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies