गुवाहाटीत झालेल्या दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने ७ बाद ४०५ धावा करून भारतासमोर ४०६ धावांचे आव्हान ठेवले. अमीर जांगू (११४), जॉन कॅम्पबेल (१०१) आणि शाई होप (१०४) यांच्या शतकांमुळे विंडीजने वनडे इतिहासात प्रथमच ४०० धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे.
विंडीजचा ४०६ धावांचा डोंगर, भारतासमोर आव्हान
Source: Prahaar