नवी मुंबई पोलिसांनी २०१ गुन्ह्यांमधील ७२६ किलो अंमली पदार्थ नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये आहे. बुधवारी तळोजा येथील शासकीय प्रकल्पात कायदेशीर प्रक्रियेनुसार हा साठा जाळण्यात आला. 'नशामुक्त नवी मुंबई' मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नष्ट केलेल्या ड्रग्सचा एकूण आकडा १,००० किलोपेक्षा जास्त झाला असून एकूण मूल्य ३९ कोटी ७४ लाख रुपयांवर पोहोचले आहे.
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ७२६ किलो ड्रग्स नष्ट
Source: Prahaar