जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. 1982 नंतर प्रथमच मिळालेल्या या विजयासह भारताने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी पात्रताही निश्चित केली. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला लालरेम्यामी ह्मार्झोटेने निर्णायक गोल केला, तर गोलरक्षक सविताने चीनचा पेनल्टी स्ट्रोक अडवत आघाडी टिकवली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला 44 वर्षांनी सुवर्ण
Source: Jai Maharashtra News