भारतीय कुस्तीपटू सुजित कलकलने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाईल अंतिम फेरीत ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुदिएव्हचा १०-९ असा निसटता पराभव करून सुवर्णपदक जिंकले. एका टप्प्यावर तो २-९ असा सात गुणांनी मागे होता, मात्र शेवटच्या ९० सेकंदात त्याने सलग चार टेकडाऊनसह आठ गुण वसूल करत बाजी पलटवली. हरियाणातील चरखी दादरीच्या २३ वर्षीय सुजितचे हे ऐतिहासिक यश ठरले.
सुजित कलकलला आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक
Source: Jai Maharashtra News