लावणीतील दिग्गज कलाकार शकुंतलाबाई नगरकर यांचे 22 सप्टेंबर रोजी कॅन्सरच्या दीर्घ आजारानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहत्या घरी निधन झाले. भातु कोल्हाटी समाजात जन्मलेल्या शकुंतलाबाईंनी संगीत बारी परंपरेतून नृत्य, गायन आणि अदाकारीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. स्टेजवरच मरण येण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली, पण जगाने त्यांना मोठी कलाकार म्हणून ओळखावे ही इच्छा पूर्ण झाली.
ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतलाबाई नगरकर यांचे निधन
Source: BBC Marathi