अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांवर विखे पाटील आणि थोरात गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून प्रत्येकी चार जागांवर दावा केला जात असून सभापती राम शिंदे यांच्यासाठी एक जागा राखून ठेवण्याची मागणी गणित गुंतागुंतीचे करत आहे. आमदार संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक मानली जात असून बंधू सचिन जगताप यांना बिगरशेती मतदारसंघातून संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत ७ जागांवर विखे-थोरात रस्सीखेच
Source: Sarkarnama