उकडलेली कडधान्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फोलेट यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. मूग, मटकी, हरभरा, चवळी, वाटाणा आणि राजमा आहारात समाविष्ट करता येतात. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले वाटते, त्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते. मात्र कडधान्ये अर्धवट न शिजवता पूर्ण शिजवून खाणे आवश्यक आहे.
उकडलेल्या कडधान्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे
Source: Lokshahi Marathi