रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुधवारी पतधोरण जाहीर करणार असून, वाढती महागाई आणि जागतिक अनिश्चिततेमुळे रेपो दरात ७५ बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ आताच होणार की डिसेंबरपर्यंत थांबणार, यावर अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. ऑगस्टमध्ये आरबीआयने दर ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला होता.
आरबीआयचा पतधोरण निर्णय बुधवारी; रेपो दर वाढीवर मतभेद
Source: Asianet Marathi