महाराष्ट्रात राष्ट्रीयीकृत बँकांकडून आतापर्यंत केवळ ८ टक्के पीककर्ज वितरण झाले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत त्यांनी बँकांना आडमुठे धोरण सोडून कागदपत्रांचा तगादा न लावण्याचे निर्देश दिले. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात सध्या ४५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांचे केवळ ८ टक्के पीककर्ज वितरण
Source: Agrowon