जागतिक ऊर्जा संकट, वाढते व्याजदर आणि टॅरिफबद्दलची अनिश्चितता असूनही भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टीत गेल्या आठ आठवड्यात सातत्याने घसरण झाली असून रॉयटर्सनुसार ही 25 वर्षांतील निचांकी घसरण आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील विस्कळीत वाहतुकीमुळे कच्च्या तेलाचे भाव 100 डॉलरवर गेले असून परदेशी गुंतवणूकदारांनी दोन वर्षांत 40 अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत.
वाढती अर्थव्यवस्था, तरीही शेअर बाजारातील घसरण
Source: BBC Marathi