BEST उपक्रमाचा 2027-28 चा अर्थसंकल्प समितीसमोर सादर झाला. एकूण उत्पन्न 8,559.06 कोटी तर खर्च 9,876.56 कोटी रुपये अपेक्षित असून तूट 1,317.50 कोटी राहणार आहे. परिवहन विभागाची तूट 1,518.71 कोटी, तर विद्युत विभागातून 201.21 कोटींचा अधिशेष अपेक्षित आहे. वीज वितरण आधुनिकीकरण, सायबर सुरक्षा आणि बस ताफा 10 हजारांपर्यंत वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
BEST अर्थसंकल्पात 1,317 कोटींची तूट
Source: Lokshahi Marathi