मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच, देशभरातील 42 माजी न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ उघड पत्र जारी केले आहे. पुराव्याशिवाय लावले जाणारे मतचोरीचे आरोप आणि घटनात्मक संस्थांची बदनामी लोकशाहीवरील विश्वास डळमळीत करू शकते, असा इशारा त्यांनी दिला. टीका करण्याचा अधिकार असला तरी बदनामीचा नाही, असे सांगत त्यांनी एसआयआरला पूर्ण पाठिंबा दिला.
निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 42 माजी न्यायाधीशांचे उघड पत्र
Source: Jai Maharashtra News