नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या परिसरातील कुपनलिकांमधून पिवळ्या रंगाचे, उग्र वासाचे रासायनिक पाणी येत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रक्रिया न करता सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, गरज भासल्यास कंपन्या बंद कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. दूषित पाण्याचा वापर रोखण्यासाठी हातपंप व कुपनलिका सील करण्याचे आदेशही देण्यात आले.
अंबडमधील दूषित पाण्यावर कठोर कारवाईचे महाजनांचे निर्देश
Source: Prahaar