महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या सुरुवातीला उकाडा वाढला असतानाच काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर व घाट परिसरात हलक्या सरींसह मेघगर्जना होऊ शकते, तर गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व बहुतांश भागांत हवामान कोरडे व उष्ण राहील.
महाराष्ट्रात हवामान बदलणार; काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
Source: Prahaar