जागतिक अंडी दिनानिमित्त अंडी उत्पादनात भारताने मोठी झेप घेतली आहे. २०२४-२५ मध्ये देशात सुमारे १४९.११ अब्ज अंडी उत्पादन झाले, जे २०१४-१५ च्या ७८.४८ अब्जच्या जवळपास दुप्पट आहे. भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक असून, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक मिळून ६४ टक्क्यांहून अधिक उत्पादन करतात. महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६.१३ टक्के आहे.
जागतिक अंडी दिन: भारत दुसऱ्या क्रमांकावर, उत्पादन दुप्पट
Source: Agrowon