न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा रणजी ट्रॉफी 2026-27च्या पहिल्या सामन्यासाठी सौराष्ट्रच्या 16 सदस्यीय संघात सामील झाला आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्र 11 ऑक्टोबरपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर छत्तीसगडविरुद्ध खेळणार आहे. लाल चेंडूची लय परत मिळवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी जडेजा रणजी ट्रॉफीत खेळणार
Source: Prahaar