सिस्पे, ट्रेड्स, इनफिनाईट बिकन प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले असून त्यांची गुंतवणूक 140 कोटींपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पहिल्या टप्प्यातील 115 कोटींच्या मालमत्ता जप्तीच्या एमपीआयडी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता आणखी 60 कोटींचा पुरवणी प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. फिजी येथून राहुल काळोखेचे प्रत्यर्पण करण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
सिस्पे घोटाळा: 175 कोटींच्या मालमत्तांचा माग, 8 हजार गुंतवणूकदारांचे जबाब
Source: Deshdoot