छत्रपती संभाजीनगरमधील 'रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स' या बेकरीचा अन्न परवाना एफडीएने निलंबित केला आहे. ग्राहकाला विकलेल्या कप केकमध्ये प्लास्टिक आणि रबरचे तुकडे सापडल्याच्या तक्रारीनंतर ७ ऑक्टोबर रोजी अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीत अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि बिगर-फूड ग्रेड पॅकेजिंगचा वापर आढळून आला. सर्व त्रुटी दूर करून लेखी मान्यता मिळेपर्यंत उत्पादन व विक्रीवर बंदी आहे.
कप केकमध्ये प्लास्टिक आढळल्याने बेकरीचा परवाना निलंबित
Source: Prahaar