रणजी ट्रॉफी सुरू असतानाच भारत अ संघ २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील हा संघ तीन कसोटी सामने खेळेल. यामुळे निवड झालेले खेळाडू रणजीच्या मोठ्या भागातून बाहेर राहतील. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर संताप व्यक्त करत देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व कमी होत असल्याचं म्हटलं आहे.
रणजी सुरू असताना भारत अ दौऱ्यावर वेंगसरकरांची टीका
Source: Prahaar