नागोयातील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल अंतिम सामन्यात उत्तर कोरियाच्या जागतिक विजेत्या हान चोंग सॉन्गचा ११-७ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. हांगझोऊत कांस्य जिंकलेल्या अमनने या गटात आशियाई स्पर्धेचे सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी सुजीत कलकलने ६५ किलो गटात सुवर्ण जिंकले होते.
अमन सेहरावतला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुस्त सुवर्ण
Source: Lokshahi Marathi