महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी मुंबईत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. SIR 2026 प्रक्रिया रद्द करणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, बॅलेट पेपरवर मतदान आणि पारदर्शक मतदार याद्या या प्रमुख मागण्या आहेत. ही मोहीम आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असून राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
मनसे-ठाकरे गटाची मुंबईत स्वाक्षरी मोहीम
Source: Lokshahi Marathi