ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी ‘मिरर’ पॉडकास्टमध्ये आपल्या अभिनयप्रवासाचा, संघर्षाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा उलगडा केला. चौथीत ‘भाजीचं संमेलन’ नाटकातील बटाट्याच्या भूमिकेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीपर्यंत पोहोचला. १४ वर्षे खो-खो खेळलेल्या पुळेकर यांनी कठीण काळात पत्नीच्या पाठिंब्याचे आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी उलगडला जीवनप्रवास
Source: Lokshahi Marathi