शाहरुख खानचा 'किंग' हा ॲक्शन थ्रिलर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, २ नोव्हेंबर रोजी त्याच्या वाढदिवशी टीझर येण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाचं बजेट ४५० कोटी रुपये असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. करीना कपूर खान 'डॅडी कूल' या स्पेशल गाण्यात दिसणार असल्याची चर्चा आहे. मेकर्सनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
शाहरुखच्या 'किंग'चा टीझर २ नोव्हेंबरला?
Source: Asianet Marathi