मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेने ५१० रुपयांचा दंड भरल्यानंतर महिला उपमुख्य तिकीट निरीक्षक हरप्रीत कौर कामत यांच्या हाताचा चावा घेतला. अंधेरी स्थानकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमी झालेल्या कामत यांच्यावर उपचार सुरू असून आरोपी महिला पसार झाली आहे. अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
मुंबई लोकलमध्ये महिला तिकीट निरीक्षकाला चावा
Source: Jai Maharashtra News