पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूर येथे रिंटू घोष (47) याने पत्नी सीमा सरकार (42) हिची धारदार शस्त्राने हत्या करून तिचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर तो पत्नीचे शीर हातात घेऊन मंदिरात बसला. वैवाहिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेच्या वेळी दोन मुले घरात होती.
पश्चिम बंगालमध्ये पतीकडून पत्नीची हत्या, शीर घेऊन मंदिरात बसला
Source: Jai Maharashtra News