धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 4,800 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,46,600 रुपयांवर पोहोचला. चांदी 14,000 रुपयांनी वधारून प्रति किलो 1,93,000 रुपयांवर गेली. सणासुदीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी ही वाढीची कारणे असून, पुढील काही दिवस दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी
Source: Jai Maharashtra News