शिवसेनेचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले. नार्वेकर यांनी दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन करून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची सरमिसळ केल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच खरा राजकीय पक्ष असून, नार्वेकर यांचा निर्णय कायद्याच्या तत्त्वांविरुद्ध आहे, असे सिब्बल यांनी म्हटले.
नार्वेकर यांचा निर्णय अधिकारक्षेत्राबाहेर: सिब्बल
Source: Saamana