घरात किंवा ऑफिसमध्ये अचानक Wi-Fi बंद पडल्यास वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मोठा त्रास होतो. मात्र प्रत्येक वेळी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याची गरज नसते; राउटरचा प्लग काढून ३० सेकंद थांबून पुन्हा सुरू करा, Power, Internet, PON किंवा LOS इंडिकेटर तपासा आणि फायबर व LAN केबल्स नीट जोडलेल्या आहेत का हे पाहा. मोबाइलमध्ये Airplane Mode चालू-बंद करा, नेटवर्क Forget करून पुन्हा कनेक्ट करा, राउटर मध्यवर्ती उंच ठिकाणी ठेवा आणि रिचार्ज किंवा बिलाची मुदत संपली नाही ना ते तपासा.
Wi-Fi बंद पडल्यास स्वतः करा १० सोपे उपाय
Source: Lokshahi Marathi