श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ५१४ उमेदवार अंतिम यादीत कायम राहिल्याने सर्वच राजकीय गटांसमोर पॅनेल निश्चितीचे आव्हान उभे ठाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षित जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन केले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया बारामतीत पार पडणार आहे. भाजप, शिवसेना आणि शरद पवार गटही स्वतंत्र मोर्चेबांधणी करत आहेत.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी ५१४ दावेदार
Source: Sarkarnama