फूलबाजारात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप; कारवाईची मागणी

फूलबाजारात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप; कारवाईची मागणी

पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात शेतकऱ्यांच्या फुलांना प्रत्यक्ष विक्री दरापेक्षा २० ते ३० रुपये कमी दर दाखवून पट्ट्या केल्या जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा फूल उत्पादक शेतकरी संघाने केला आहे. संघाने बाजार समिती सभापती प्रकाश जगताप यांना निवेदन देऊन आर्थिक शोषण थांबवण्याची आणि नियम मोडणाऱ्या अडत्यांचे परवाने निलंबित करण्याची मागणी केली. कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष कृषीभूषण महादेव शेंडकर यांनी दिला.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies