बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाली असून २३ सप्टेंबरच्या रात्री विशाखापट्टणम आणि गोपालपूरदरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवून बचाव पथके सज्ज करण्यात आली आहेत; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन; ओडिशा-आंध्र किनारपट्टी सतर्क
Source: Lokshahi Marathi