शिकागो विद्यापीठाच्या Climate Impact Lab च्या मूल्यांकनानुसार, सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान जगभरात सुमारे २.३९ लाख अतिरिक्त उष्णताजन्य मृत्यू होण्याचा अंदाज आहे. भारतात सुमारे १५,८०० अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून त्यातील निम्मे डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान होऊ शकतात. संपूर्ण एल निनो कालावधीत हा आकडा ४.५१ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हे निश्चित मृत्यू नसून हवामान अंदाजावर आधारित संभाव्य मूल्यांकन असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
एल निनोमुळे जगभर २.३९ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज
Source: Lokshahi Marathi