राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेऊन मंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ ट्रिगर-१ मधील तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशयांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अपुरा पाऊस आणि कमी पाणीसाठ्यामुळे मत्स्यबीज संचयन व उत्पादनावर परिणाम होत असून मच्छिमारांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुष्काळाचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; राणेंचे पाहणीचे निर्देश
Source: Prahaar