महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट खाद्यतेल, दूध, मिठाई व बेकरी साहित्य जप्त केला. नागपूर विभागात १ कोटी ३१ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा व ३ वाहने जप्त होऊन ७ जणांना अटक झाली. अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित करून व्यवसाय बंद नोटिसा बजावल्या असून, आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
राज्यभर FDA धडक कारवाई; कोट्यवधींचा निकृष्ट साठा जप्त
Source: Prahaar