मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी १३ कडक निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी, तीव्र लेझर लाइट्सवर प्रतिबंध, साऊंड लिमिटर व डेसिबल मीटर अनिवार्य तसेच मंडळांकडून १ लाख रुपये अनामत रक्कम घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून राज्यभर तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सवात फटाके बंदी, डीजे-लेझरवर हायकोर्टाचे कडक निर्बंध
Source: Prahaar